
चित्रपट ‘बळी' विधुर, मध्यमवर्गीय वडिल श्रीकांतच्या (स्वप्नील जोशी) जीवनप्रवासाला दाखवतो. त्याचा ७ वर्षाचा मुलगा मंदार (समर्थ जाधव) चक्कर येऊन पडतो आणि सविस्तर निदानासाठी त्याला जनसंजीवन हॉस्पिटलमध्ये नेते जाते. येथून श्रीकांतच्या जीवनाला अनपेक्षित कलाटणी मिळते. स्थितीला रोमांचक वळण मिळते जेव्हा मंदार एका रहस्यमय परिचारिकेसोबत बोलायला सुरूवात करतो. तो ती परिचारिका हॉस्पिटलच्या पडक्या भागामध्ये राहत असल्याचा दावा करतो.
''अमेझॉन प्राइम व्हिडिओने नेहमीच प्रेक्षकांसाठी कथानक, रोमांचक पटकथा व लक्षवेधक अभिनयासंदर्भात वरचढ ठरणारे कन्टेन्ट सादर करण्याचा प्रयत्न केला आहे,'' असे अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या भारतीय कन्टेन्टचे संपादन प्रमुख मनिष मेंघानी म्हणाले.
''प्रेक्षकांनी चित्रपट 'छोरी'वर केलेला प्रेमाचा वर्षाव पाहता आम्हाला विशाल फ्युरियासोबचा सहयोग सुरू ठेवण्याचा आनंद होत आहे. ते भारतातील हॉरर शैलीला पुनर्परिभाषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वप्नील जोशी, तसेच प्रतिभावान कलाकारांसह‘बळी आमच्या झपाट्याने विकसित होणा-या प्रादेशिक भाषा कन्टेन्ट पोर्टफोलिओमध्ये अधिक मूल्याची भर करतो.''
दिग्दर्शक विशाल फ्युरिया म्हणाले, ''हॉरर या शैलीने माझे लक्ष वेधून घेतले आहे आणि या शैलीमधील प्रत्येक चित्रपटासह काहीतरी नवीन घेऊन येण्याचा माझा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. सर्वोत्तम भयपट म्हणजे मनावैज्ञानिकाशी संबंधित चित्रपट, जे वास्तविकतेपासून दूर असलेल्या पात्रांसाठी सहानुभूती निर्माण करतात. आपण जे पाहतो त्यावर जितका अधिक विश्वास ठेवू, ते तितके अधिक रोमांचक बनत जाते. हेच‘बळी च्या बाबतीत आहे. या चित्रपटामधील सर्व पात्रांमधील भावना, भय लक्षवेधक आहेत.
मी माझ्यावर कामावर विश्वास ठेवण्यासाठी निर्माते अर्जुन व कार्तिक यांचे आभार मानतो. चित्रपट 'छोरी'ला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर मी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाप्रती प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक आहे.''
from मनोरंजन https://ift.tt/3piInNE
Post a Comment