
अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांची प्रमुख भूमिका असलेला लकडाऊन हा चित्रपट येत्या २८ जानेवारी ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा ही त्याच्या नावातच लपलेली आहे. लॉकडाऊन दरम्यान ठरलेल्या एका लग्नाची ही धमाल गमतीची गोष्ट आहे. लकडाऊन या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाची कथा ज्या प्रमाणे लॉकडाऊन मध्ये घडली तसाच हा चित्रपट लॉकडाऊन मध्ये चित्रित केला आहे. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्णतः शिवजन्मभूमी जुन्नर (किल्ले शिवनेरी) येथे झाले आहे. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अंकुश आणि प्राजक्ता लग्नाच्या बेडीत अडकलेले दिसत असले तरी त्यासाठी त्यांना करायला लागणारी धावपळ म्हणजे या चित्रपटाचं कथानक. चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश आणि प्राजक्ता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. चित्रपटाला संगीत अविनाश - विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली असून चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे.
from मनोरंजन https://ift.tt/3D53yHO
Post a Comment