
साईशाच्या आई वडिलांनी तिच्यासोबत इंस्टाग्रामवर एक लाइव्ह केले होते. त्यावेळी त्यांनी कार्तिकीने मालिका का सोडली याबाबतचे कारण सांगितले होते. तसेच “पण आम्ही कल्याणला राहतो. रंग माझा वेगळाचे शूटींग हे मालाडमध्ये होते. तिकडे दररोज जाण्या-येण्यात दोन तास लागतात. त्यामुळे तिला शाळेत आणि अभ्यासासाठी फार वेळ मिळत नव्हता. तसेच यामुळे तिच्या तब्येतीवरही परिणाम जाणवू लागला आहे”, असेही त्यांनी सांगितले.
साईशाला एका नव्या प्रोजेक्टची ऑफर मिळाली असल्याने तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साईशा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याचे सांगण्यात आहे. साईशा म्हणाली की, “मला खूप कंटाळा आला होता. मला शाळेत जायचे आहे. तुम्ही साईशाला म्हणजे मला कार्तिकीच्या भूमिकेत प्रेम दिले तसेच नव्या येणाऱ्या कार्तिकीलाही द्या, असे तिच्या आई वडिलांनी सांगितले. साईशा ही लवकरच रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे.
from मनोरंजन https://ift.tt/DEVhBCI
Post a Comment