डॉनी रागिणी ची रसिकांना "मी हरिदासी' एक सुरमई मेजवानी

https://ift.tt/SoTQah8

shri hari

दोन वर्षाच्या खंडानंतर आषाढी एकादशीला वैष्णवांचा मेळा पंढरपुरी जमला, आणि बघता बघता सावळ्या विठुरायाच्या रंगी अवघा महाराष्ट्र रंगला! या विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी संगीतकार डॉनी हजारिका व रागिणी कवठेकर जोडीने 'मी हरिदासी' हे सुरेल गाणं रसिकांसाठी नुकतंच प्रदर्शित केलं आहे. हे गाणं रागिणी कवठेकर वर चित्रित करण्यात आले असून, आवाज देखील तिचाच आहे. या गाण्याला 'शशांक कोंडविलकर' यांनी शब्दबद्ध केले असून त्याचे विडिओ दिग्दर्शन के. सी. लॉय यांचे आहे.
 

डॉनी रागिणी बँडने यापुर्वी ओ अंतावा या गाण्याचे मराठी व्हर्जन सादर केले होते, शिवाय अनेक हिंदी गाण्यांचे संगीतदिग्दर्शन देखील त्यांनी केलं आहे. पण खास आषाढी एकादशीचं औचित्य साधत सोशल मिडीयावर प्रदर्शित झालेल्या 'मी हरिदासी' या शास्त्रीय संगीतमय साजेचा बाजंच निराळा आहे.



from मनोरंजन https://ift.tt/BHC3QM1

Post a Comment

Previous Post Next Post