
एका नव्या मराठी चित्रपटासाठी प्राजक्ताच्या नावाची वर्णी लागली आहे. याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ती लंडनला पोहोचली आहे.
“हो शुभारंभ हा शुभारंभ मंगल बेला आयी. लंडनमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरु. जवळपास अर्धी मराठी चित्रपटसृष्टी लंडनला येऊन चित्रपटांचं चित्रीकरण करून गेली. मलाही हा अनुभव घ्यायचा होता.” अशी पोस्ट मध्यंतरी प्राजक्ताने केली होती.
आता लंडनमधील काही फोटो प्राजक्ताने शेअर केले आहेत.चित्रीकरणाबरोबरच प्राजक्ता मिळालेल्या वेळेमध्ये लंडनमधील काही ठिकाणी जात आहे.
तिने फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी देखील तिच्या फोटोंवर गंमतीशीर कमेंट केल्या आहेत.फरसाण घेऊन गेलीस का? असा प्रश्न एका युजरेने कमेंटच्या माध्यमातून विचारला आहे. तर काहींनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.प्राजक्ता लंडनमध्ये चित्रीकरण करत असलेला चित्रपट नक्की कोणता? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.
from मनोरंजन https://ift.tt/E4TFJMw
Post a Comment