जॅकलिन फर्नांडिझची ईडीकडून सात तास चौकशी

https://ift.tt/ncVmRzg

jacqueline

सुकेश चंद्रशेखर प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिची सोमवारी 19 सप्टेंबर,2022 रोजी दिल्ली पोलिसांनी तब्बल 7 तास कसून चौकशी केली. ती दुपारी जवळपास 2 च्या सुमारास दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचली. त्यानंतर जवळपास साडेनऊच्या सुमारास जॅकलीन कार्यालयाच्या बाहेर आलेली दिसली.

 

जॅकलिनशी याआधी बुधवारी देखील चौकशी करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत जॅकलिनची सुकेश चंद्रशेखर प्रकरणात दोनदा चौकशी केलेली आहे.


सुकेश प्रकरणात आर्थिक गुन्हा शाखेनं याआधी जॅकलिनला 14 सप्टेंबर रोजी(बुधवारी) चौकशीसाठी बोलावले होते. त्यादिवशी सुकेशची मैत्रिण आणि एजंट पिंकी इराणी देखील चौकशीसाठी हजर राहिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नोरा फतेही,तिचा जिजाजी बॉबी आणि पिंकी इराणी यांची एकत्र चौकशी केली गेली.

 



from मनोरंजन https://ift.tt/lODais7

Post a Comment

Previous Post Next Post