चित्रपटातील किसींग सीन, बोल्ड दृश्य याकडे मी कामाचा भाग म्हणून पाहतो - अभिनेता संतोष जुवेकर

https://ift.tt/54QPjME

santosh juvekar

चित्रपटातील किसींग सीन, बोल्ड दृश्य याकडे मी कामाचा भाग म्हणून पाहतो - अभिनेता संतोष जुवेकर

अभिनेता संतोष जुवेकर मोरया, झेंडा या चित्रपटांतून घराघरात पोहोचला. संतोषचा ‘३६ गुण’ हा चित्रपट ४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ‘३६ गुण’ला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत असून चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत. या चित्रपटात संतोषने मुख्य भूमिका साकारली असून अभिनेत्री पूर्वा पवार प्रमुख नायिकेच्या भूमिकेत आहे.

 

ग्रह-तारे, पत्रिका, एका भेटीतच साताजन्माच्या गाठी बांधणे या सगळयाच्या पलीकडे जाऊन नव्या नात्याची सुरुवात करीत असताना कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं असा विचार मांडणारा ‘३६ गुण’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात संतोष जुवेकरने नायिकेबरोबर किसिंग सीन दिले आहेत. ट्रेलरमध्ये चित्रपटातील या बोल्ड दृश्यांची झलक दिसली होती. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीचा संतोष जुवेकरचा हा चित्रपट चर्चेत होता. चित्रपटातील त्याच्या बोल्ड सीनची प्रचंड चर्चा होत आहे. संतोषने ‘३६ गुण’मधील त्याच्या बोल्ड सीनबद्दल नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.

संतोषने रेडिओ मिरचीला मुलाखत दिली. यामध्ये त्याला चित्रपटातील बोल्ड दृश्यांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “नवख्या कलाकारांना चित्रपटातील बोल्ड सीन करण्याबाबत काय सल्ल द्याल”, असा प्रश्न संतोषला विचारला गेला. यावर उत्तर देताना संतोष म्हणाला “मुळात चित्रपटातील बोल्ड सीन ही कथेची गरज असली पाहिजे. बोल्ड सीन करताना काही जाणवतं का, असा प्रश्न मला एकाने विचारला होता. चित्रपटातील किसींग सीन, बोल्ड दृश्य याकडे मी कामाचा भाग म्हणून पाहतो आणि सगळ्यांनी याकडे त्याच दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे”.
Edited by : Ratnadeep Ranshoor



from मनोरंजन https://ift.tt/5j1f6iG

Post a Comment

Previous Post Next Post