सोनू : अरे सोनू, हे आंब्याचे झाड बोलू लागले
तर काय मज्जा येईल ना !
मोनू : मजाच येईल !
कारण, ते बोलू लागल्यावर
प्रथम तुला सांगेल, की मी आंब्याचे नाही तर वडाचे झाड आहे.
पाय बघा आणि सांगा
गणूच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे अधिकारी येतात.
विज्ञानातील पुस्तकातल्या एका प्राण्याचे
नुसतेच पाय दाखवून मन्याला तो प्राणी ओळखायला सांगतात.
गणू : काय ओळखायला येत नाही सर
अधिकारी : मुर्खा, एवढं सोपं असूनही
ओळखता येत नाही? नाव काय तुझं?
गणू : माझे पाय बघा आणि तुम्हीच सांगा
मोनाच्या मुलाची तक्रार घेऊन शेजारच्या काकू येतात
काकू - ज्याने माझ्या खिडकीची काच फोडली...
तो तुझा मुलगा आहे ना?
मोना - नाही, तुमची स्कूटी पंक्चर करणारा तो माझा मुलगा आहे.
भाजी कमी पडली
नवरा - आज, भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय...
बायको - मीठ बरोबर आहे.
भाजीच कमी पडलीय...
सांगितलं होत ना जास्त आणा म्हणून.
बाई आणि देव
एकदा एका बाईवर देव प्रसन्न होतात.
देव - एक वरदान माग.
बाई - मला तीन वरदान पाहिजेत.
देव - ठीक आहे, पण त्यासाठी तुला एक अट मान्य करावी लागेल...?
बाई - कोणती...?
देव - मी तुला जे देईन त्याच्या दहापट मी तुझ्या सासूला देईन.
(देवाला वाटले ती स्री निरुत्तर होईल.)
बाई - चालेल.
देव - मग ठीक आहे, माग वरदान...
बाई - मला सर्वात सुंदर बनव.
देव - तथास्तु...
(इकडे सासू दहापट सुंदर होते.)
बाई - मला भरपूर संपत्ती द्या.
देव - तथास्तु...
(इकडे सासूला सुनेपेक्षा दहापट संपत्ती जास्त मिळते.)
बाई - मला एक हलकासा हार्ट अटॅक येऊ द्या.
देव - तथास्तु...
(इकडे सासूला सुनेपेक्षा दहापट हार्ट अटॅक येतो. सासू सरळ वर...)
आता सासूची संपत्ती देखील सुनेचीच होते.
Edited By - Priya Dixit
from मनोरंजन https://ift.tt/PkoubLg
Post a Comment