
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपट प्रचंड गाजला होता
चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती
‘सैराट’ हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने अनके रेकॉर्ड ब्रेक केले होते. यात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांनी डेब्यू केले होते. या चित्रपटातील परश्या- आर्चीची जोडी प्रेक्षकांच्या मनात उतरली होती. प्रेमावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता.
सैराट चित्रपटाने आकाश आणि रिंकूला रातोरात स्टारडम दाखवले. त्यांना पहिल्याच चित्रपटात लोकप्रियता मिळवून दिली. दोघांचा पहिलाच चित्रपट आणि तो ही सुपरहिट ठरल्याने ते प्रसिद्धीझोतात आले.
29 एप्रिल 2016 साली सैराट चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला होता आणि आज या चित्रपटाला सात वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने आकाश ठोसरने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन खास पोस्ट शेअर केली आहे. आकाशने सैराट चित्रपटाचं पोस्टर शेअर केले आहे. सैराटला सात वर्ष पूर्ण झाली असं कॅप्शन पोस्टला दिले आहे.
आकाशच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट केले आहेत.
तर रिंकूने देखील 7 years of SAIRAT Unforgettable journey कॅप्शन देत आकाशसोबतचे फोटो शेअर केले आहेत. त्यावरही भरभरुन प्रतिसाद येत आहे.
from मनोरंजन https://ift.tt/wo7JX9x
Post a Comment