सैनिक शाळांमधील प्रवेश परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट

https://ift.tt/3pS6jZD
Entrance Exam: ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झाम (All India Sainik School Entrance Examination, AISSEE 2022 admit card) संदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे. देशभरातील सैनिक शाळांमध्ये इयत्ता सहावी आणि नववीच्या प्रवेशासासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे लवकरच प्रवेशपत्र जाहीर केले जाणार आहे. सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना सैनिक स्कूलची अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर प्रवेशपत्र मिळू शकणार आहे. ही परीक्षा ९ जानेवारीपासून होणार आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर एआयएसएसईई प्रवेशपत्र २०२२ (AISSEE Admit card 2022) संबंधी अपडेट मिळू शकणार आहे. इयत्ता सहावी आणि नववीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करणारे सैनिक शाळा प्रवेश परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र तपासू आणि डाउनलोड करू शकतात. एनटीएने अद्याप AISSEE २०२२ प्रवेशपत्र जाहीर करण्याची तारीख आणि वेळ जाहीर केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोर्टलवर अपडेट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट- aissee.nta.nic.in वर जा. त्यानंतर AISSEE प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करा. आता एक लॉगिन पेज खुले होईल. मागितलेली माहिती भरा. त्यानंतर स्क्रीनवर AISSEE प्रवेशपत्र २०२२ दिसेल. प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भांसाठी प्रिंट घ्या AISSEE २०२२ च्या वेळापत्रकानुसार, इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी २ ते ४.३० या वेळेत घेतली जाईल. इयत्ता नववीच्या प्रवेशाची परीक्षा दुपारी २ ते ५ या वेळेत घेतली जाणार आहे. एनटीएतर्फे AISSEE परीक्षा ओएमआर उत्तरपत्रिकेद्वारे आयोजित केली जाईल. ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर परीक्षेशी संबंधित अधिक माहिती मिळू शकणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/333g26k

Post a Comment

Previous Post Next Post