IBPS क्लर्क पूर्व परीक्षेचा निकाल लवकरच, किती असेल कटऑफ? जाणून घ्या

https://ift.tt/3KbiQ2n
IBPS Clerk Date: इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल, IBPS क्लर्क प्रीलिम्स २०२१ चा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. या परीक्षेला बसलेले लाखो उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. ही परीक्षा तीन दिवसांत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा १२,१८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. IBPS Clerk Prelims 2021 चे निकाल जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट ibps.in वर पाहता येणार आहे. आपला कट ऑफ कितपत जातो हे उमेदवारांना जाणून घ्यायचे असते. यासंदर्भात अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नसली तरी मागील परीक्षेचा कट ऑफ आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. राज्य/केंद्रशासित प्रदेश अपेक्षित कट-ऑफ २०२१ आंध्र प्रदेश ७५-८० दिल्ली ७४-७८ बिहार ७०-७५ गुजरात ६९-७४ हिमाचल प्रदेश ६९-७५ केरळ ७५-८० मध्य प्रदेश ७५-७९ महाराष्ट्र ६५-७३ ओडिशा ७१-७६ पंजाब ७२-७८ राजस्थान ७५-८० कर्नाटक ६४-६८ पश्चिम बंगाल ६०-६४ तामिळनाडू ६८-७४ उत्तर प्रदेश ७२-७९ तेलंगणा ७२-७६ IBPS लिपिक भरती २०२१ द्वारे, ५,८०० हून अधिक रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ज्यासाठी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. कट-ऑफ वर देण्यात आलेल्या अंदाजे कट-ऑफपेक्षा वेगळा असू शकतो. हा केवळ अंदाज आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती आयबीपीएसने जाहीर केल्यानंतरच नेमका कट ऑफ समजू शकेल. या परीक्षेत सहभागी झालेले जे उमेदवार किमान कट-ऑफसाठी पात्र असतील त्यांना या महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी किंवा पुढील फेरीसाठी पात्र मानले जातील. आयबीपीएस क्लर्क प्रिलिम्स २०२१ परीक्षेत १०० एमसीक्यू प्रश्न विचारण्यात आले होते. याआधारे उमेदवारांचे मूल्यांकन केले जाईल. यासाठी उमेदवारांना १ तासाचा वेळ देण्यात आला होता. तज्ज्ञांच्या मते, यावेळी परीक्षेची काठीण्य पातळी सरासरीपेक्षा सोपी होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rekCY7

Post a Comment

Previous Post Next Post