UGC NET चा निकाल कधी? जाणून घ्या महत्वाची अपडेट

https://ift.tt/3fn0nBK
UGC NET Cut-Off, : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अलीकडेच डिसेंबर २०२० आणि जून २०२१ ची यूजीसी नेट परीक्षा एकत्रितपणे अनेक टप्प्यांत घेतली. करोना प्रादुर्भावमुळे यूजीसी नेट परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर जवाद चक्रीवादळामुळे बाधित भागात काही विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. उमेदवार आता निकालाची वाट पाहत आहेत आणि कट ऑफ किती जाईल हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, यूजीसी नेट परीक्षेचा निकाल ३० जानेवारी २०२२ पर्यंत किंवा या तारखेच्या आसपास जाहीर होण्याची अपेक्षा आहे. २०२० च्या परीक्षेचा निकाल १ डिसेंबर रोजी जाहीर झाला. २०१९ मध्ये, यूजीसी परीक्षेचा निकाल ३१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. तर २०१८ मध्ये निकाल १ फेब्रुवारीला जाहीर झाला होता. यावेळी परीक्षेला उशीर झाला असून निकालही उशिरा जाहीर होऊ शकतो. साधारणपणे यूजीसी नेट परीक्षेच्या १४-१५ दिवसांनी निकाल जाहीर केला जातो. परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाहीर केला जाईल. अनेक आघाडीच्या ऑनलाइन संस्थांनी जारी केलेल्या अनधिकृत उत्तरतालिका वापरून उमेदवार त्यांचे गुण पाहू शकतात. अधिकृतपणे यूजीसी नेट २०२१ उत्तरतालिका जाहीर केली नाही. यासाठी विद्यार्थ्यांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. एनटीएने यूजीसी नेट २०२१ चा निकाल जाहीर केल्यानंतर उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे. बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवारांना निकाल पाहता येईल. NTA UGC NET 2021: असा पाहा निकाल निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाइटवर जा. निकाल/स्कोअर कार्डची सक्रिय लिंक होमपेजवर दिसेल. उमेदवार अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख किंवा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड वापरून त्यांचा निकाल तपासू शकतील. सर्व तपशील भरल्यानंतर साइन-इनवर क्लिक करा. यानंतर परीक्षेचा निकाल पीडीएफ स्वरूपात स्क्रीनवर दिसेल. निकाल डाऊनलोड करुन सेव्ह करा. दरवर्षी यूजीसी नेटचा कट ऑफ देखील परीक्षेच्या निकालासोबत जाहीर केला जातो. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना पेपर-1 मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे, तर EWS/SC/ST/OBC/PwD/ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी पात्रता गुण १०० पैकी ३५ आहेत. दुसरीकडे, पेपर-2 मध्ये, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना २०० पैकी ७०-७५ गुण, तर OBC/EWS उमेदवारांना ६५-७० गुण, एससी उमेदवारांना ६०-६५ गुण आणि एसटी उमेदवारांसाठी पात्रता गुण ५५-६० आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qnrhjm

Post a Comment

Previous Post Next Post