https://ift.tt/3fl9dA5
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r9ADhQ
Prelims 2021: इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल, IBPS क्लर्क प्रीलिम्स २०२१ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेले लाखो उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे. ही परीक्षा तीन दिवसांत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेण्यात आली. १२,१८ आणि १९ डिसेंबर २०२१ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली. लिपिक पूर्व परीक्षेचा निकाल २०२१ जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात येणे अपेक्षित होते. या निकालात उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेत बसता येणार आहे. निकाल १९ जानेवारी २०२२ पर्यंत वेबसाइटवर पाहता येणार आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड भरावा लागेल. IBPS Clerk : असा करा डाऊनलोड अधिकृत वेबसाइटवर ibps.in वर जा. आयबीपीएस क्लर्क प्रिलिम्स निकाल असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा. बातमीखाली देण्यात आलेल्या थेट लिंकवर क्लिक करुन उमेदवारांना निकाल पाहता येणार आहे. आपला लॉगिन तपशील भरा. तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी एक प्रिंट सेव्ह आणि डाउनलोड करा. IBPS क्लर्क पूर्व परीक्षा २०२१ चे गुण अधिकृत वेबसाइटवर काही दिवसांत प्रसिद्ध केले जातील. सध्या केवळ मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे गुण जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांचे स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल. पूर्व परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेले गुण उमेदवारांच्या फायनल राऊंडसाठी ग्राह्य धरले जात नाहीत. फायनल राऊंडसाठी केवळ मुख्य परीक्षेत मिळालेले गुण विचारात घेतले जातात. आयबीपीएस क्लर्क भरतीसाठी मुलाखतीची फेरी होणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3r9ADhQ
Post a Comment