आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा ऑनलाइन

https://ift.tt/hkXj5nO
म. टा. प्रतिनिधी, नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा एकविसावा दीक्षांत सोहळा बुधवारी (दि. २ मार्च) ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सोहळ्यात प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुख, केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचे आरोग्य संशोधन विभागाचे सचिव प्रा. डॉ. बलराम भार्गव आदी ऑनलाइन सहभागी होतील. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे हा सोहळा विद्यापीठाने स्थगित केला होता. आता कुलपती कार्यालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठ अधिसभागृहात सकाळी अकरा वाजता हा सोहळा होणार असून, विद्यापीठाच्या वेबसाइटद्वारे हा सोहळा ऑनलाइन पाहता येणार आहे. या सोहळ्यात ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या व आंतरवासीता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १० हजार २३६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहेत. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना ९८ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, रोख रक्कम, पारितोषिक व ३८ विद्यार्थ्यांना पीएच. डी. प्रदान करण्यात येणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EN30gOp

Post a Comment

Previous Post Next Post