क्रीडा विज्ञान अन् व्यवस्थापनच्या अभ्यासक्रमांना UGC ची मान्यता

https://ift.tt/9Ujpyqs
म. टा. विशेष क्रीडा प्रतिनिधी, मुंबई देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठात क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापन पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम असेल. येत्या शैक्षणिक वर्षापासून पुण्यात असलेल्या या विद्यापीठात हा अभ्यासक्रम सुरू होईल. त्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने () मान्यता दिली आहे, असे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. दीड वर्षापूर्वी या क्रीडा विद्यापीठाची घोषणा झाली होती. मात्र, करोनामुळे हे विद्यापीठ सुरू झाले नव्हते. येत्या शैक्षणिक वर्षापासून यात प्रवेश सुरू होईल, असे केदार यांनी वानखेडे स्टेडियमवरील पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आणि माजी कसोटीपटू निलेश कुलकर्णी, क्रीडा विभाग उपसचिव श्रीमती नानल उपस्थित होते. क्रीडा विज्ञान आणि क्रीडा व्यवस्थापन या विषयात पदवी आणि पदव्युत्तरचा समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे भारतात संघटित स्पोर्ट्स एड क्षेत्र निर्माण करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, असेही केदार म्हणाले. या पदवींमुळे दहा अब्ज डॉलर उद्योगाच्या क्रीडा व्यवस्थापन उद्योगात संधी निर्माण होतील, असेही ते म्हणाले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात असलेल्या या क्रीडा विद्यापीठातील क्रीडा विज्ञान; तसेच क्रीडा व्यवस्थापन अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. यासाठी आयआयटी आणि आयआयएम यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. क्रीडा प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू झाला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sXx8KLp

Post a Comment

Previous Post Next Post