https://ift.tt/7l1JOyE
मराठी आणि हिंदी चित्रपटातून आपला अभिनयाचा ठसा उमटणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे निधन झाले. त्या प्रसिद्ध अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या मातोश्री होत्या. वत्सला देशमुख यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला.
from मनोरंजन https://ift.tt/mOXpHqK
त्यांच्या निधनाचे वृत्त मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करून दिले.त्यांनी हिंदी चित्रपट 'तुफान और दिया' या चित्रपटापासून करिअरची सुरुवात केली.
त्यांची पिजरा चित्रपटातली 'आक्का'ची भूमिका प्रचंड गाजली होती. या चित्रपटात त्या खलनायिकेच्या भूमिकेत होत्या. त्यांची बहीण संध्या आणि मुलगी रंजना या देखील सिनेसृष्टी जगातील प्रसिद्ध अभिनेत्री असे. वत्सला देशमुख यांनी अनेक चित्रपटात प्रमुख अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका साकारल्या आणि अजरामर केल्या.त्यांनी नवरंग, तुफान और दिया, जलबिन मछली नृत्यबिन बिजली, या हिंदी चित्रपटात काम केले. तसेच पिंजरा, बाळा गाऊ कशी अंगाई ,ज्योतिबाचा नवस हे मराठी चित्रपट केले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
from मनोरंजन https://ift.tt/mOXpHqK
Post a Comment