अभिनेत्रीकडून 75 हजार रुपये मिळाले तपासात पोलिसांना महिलेकडून मोठी रक्कम सापडली, त्यानंतर चौकशी सुरू झाली. पोलिसांना या बॅगेत अनेक पैशांच्या बॅगा सापडल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी अभिनेत्रीकडून 75,000 रुपये जप्त केले आहेत.
पोलिसांच्या चौकशीत रूपा दत्ता तिच्याकडे एवढे पैसे कुठून आले हे सांगू शकली नाही, मात्र तिने पाकिटमारी केल्याची कबुली मात्र दिली आहे. वेगवेगळ्या गजबजलेल्या भागात आणि कार्यक्रमांना भेट देऊन ती पर्स चोरायची आणि याच उद्देशाने ती कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात पोहोचली, अशी कबुली अभिनेत्रीने पोलिसांना दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रूपा दत्ताकडून एक डायरीही सापडली आहे , ज्यामध्ये तिने सर्व हिशेब लिहिला होता. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. रूपा दत्ता तिच्या व्यावसायिक आयुष्या व्यतिरिक्त इतर कारणांमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी रूपाने अनुराग कश्यपवरही काही गंभीर आरोप केले होते. रूपाने अनुरागवर फेसबुकवर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला होता.
from मनोरंजन https://ift.tt/KtjmeUL
Post a Comment