NEET MDS 2022: नीट एमडीएस परीक्षेची सुधारित तारीख जाहीर

https://ift.tt/L2d15pO
NEET MDS 2022: नॅशनल बोर्ड ऑफ एग्जामिनेशन इन मेडिकल साइंसेज (NBEMS) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट-मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (NEET-MDS) २०२२ परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे. पेपर २ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत होणार आहे. अर्ज प्रक्रिया २१ मार्च ते ३० मार्च पर्यंत सुरू राहील. जे उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू इच्छितात ते परीक्षेसाठी onnbe.edu.in वर अर्ज करू शकतात. NBEMS मार्फत जारी अधिसूचनेनुसार नीट-एमडीएस २०२२ परीक्षा आता २ मे २०२२ रोजी आयोजित करण्यात येईल. यापूर्वी अर्जांची विंडो २४ जानेवारी २०२२ रोजी बंद झाली होती, ती आता पुन्हा उघडण्यात आली आहे. यापूर्वी स्‍थगित करण्यात आली होती तारीख NEET MDS आधीच्या शेड्युलनुसार, ६ मार्च रोजी होणार होती. पण आरोग्य मंत्रालयाद्वारे इंटर्नशीप पूर्ण करण्याची कट ऑफ तारीख ३१ जुलै पर्यंत वाढवण्यात आल्यानंतर बोर्डाने परीक्षा स्थगित केली होती. इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिल्यानंतर अधिक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. १ एप्रिल ते ४ एप्रिलपर्यंत अर्जात दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे. अॅडमिट कार्ड २५ एप्रिल रोजी जारी केले जाणार आहे. आधी अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करण्यास संधी नाही ज्या उमेदवारांनी आधी ४ जानेवारी ते २४ जानेवारी २०२२ या कालावधीत अर्ज भरले असतील, ते उमेदवार पुन्हा नव्याने अर्ज करू शकता नाही. NBE ने सांगितले की ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केले आहेत आणि यशस्वीपणे परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/27MuPaz

Post a Comment

Previous Post Next Post