’पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होणार

https://ift.tt/MJfwoNT

cannes film festival

‘पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी माहिती दिली.

 

दरवर्षीप्रमाणे कान्स (फ्रान्स) येथे 17 मे ते 28 मे दरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवून देणे, देशातील चित्रिकरण व पर्यटन स्थळांचे महत्व वाढविणे या हेतुने मराठी चित्रपटांचा सहभाग कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात येतो. या महोत्सवात निवड झालेल्या मराठी चित्रपटांचे प्रतिनिधी सहभागी होतात.

 

या वर्षी कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 च्या फिल्म मार्केटिंग विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून पाठवावयाच्या ३ मराठी चित्रपटांच्या निवड प्रक्रियेसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव अंतर्गत श्री. अशोक राणे, श्री. सतिश जकातदार, श्रीमती किशोरी शहाणे-विज, श्री. धीरज मेश्राम, श्री मनोज कदम, श्री. महेंद्र तेरेदेसाई व श्री. दिलीप ठाकुर या ७ तज्ञ सदस्यांची परिक्षण समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने 32 चित्रपटांचे परिक्षण करुन एकमताने नटराज एन्टरटेनमेंट निर्मित “पोटरा”, नाईन आर्चस पिक्चर कंपनी निर्मित “कारखानीसांची वारी” आणि बीइंग क्रिएटिव्ह पिक्चर्स निर्मित “तिचं शहर होणं” या चित्रपटांची कान्स फिल्म फेस्टिवल (CFF) 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे.



from मनोरंजन https://ift.tt/lxpN8Ai

Post a Comment

Previous Post Next Post