
मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी जळगावच्या ललिता कोण होणार करोडपती या खेळात सहभागी झाल्या आहेत.बुधवारी २२ जून रोजी ललिता या हॉटसीटवर येणार आहेत . ललिता यांना मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवायचे आहेत. ललिता या अंगणवाडी शिक्षिका आहेत. त्या आधी सेविका म्हणून काम करत होत्या पण त्यांना स्वतःची प्रगती करायची होती. म्हणून त्यांनी लग्नानंतर अजून शिक्षण घ्यायचे ठरवले. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने कधी ओवाळणीतून किंवा अजून कुठून जर पैसे भेट म्हणून मिळाले तर ते पैसे त्या जपून ठेवत आणि लागतील तसे ते पैसे शिक्षणासाठी वापरत. असे करून त्यांनी एम.ए. केले आणि त्या शिक्षिका झाल्या.
ललिता यांचे लग्न एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाले. त्यामुळे सासरी देखील पैशाची अडचण कायम असायची. कधी हवामान साथ देत नाही तर कधी पिकाला हवा तो भाव मिळत नाही. म्हणून कायम हातात जेमतेम पैसा असे. या सगळ्या मुळे कर्ज घेण्याची वेळ आली पण आता ते कर्ज फेडणार कसे. फेडण्याचा काही मार्ग दिसला नाही म्हणूनललिता यांच्या पतीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आणि ललिता आणि मुलांना सोडून निघून गेले. त्यानंतरचा खडतर प्रवास ललिता यांनी एकटीने केला. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात येऊन त्या त्यांच्या मुलांचं भविष्य सुधारू इच्छितात त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा त्यांचा उद्देश आहे. पाहायला विसरु नका ‘कोण होणार करोडपती २२ जून बुधवार रोजी ‘ रात्री ९ वाजता. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
from मनोरंजन https://ift.tt/uZ9RgX3
Post a Comment