कोल्हापूर शहरातील ताराबाई रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळेच्या पिछाडीस असणाऱया पंगूवाडय़ात लहानाचा मोठा झालेला गौतम दहावी व बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेला होताच. लहानपणापासून लेखनाचा छंद जपणाऱ्या गौतम पंगू यांनी संशोधन कार्यात नावलौकिक कमवत असतानाही विविध प्रकारचे मराठी लेखन करणे सुरू ठेवले आहे. विशेषतः परदेशात स्थलांतरित भारतीयांच्या आयुष्याचे वेगवेगळे पैलू ते आपल्या लेखनातून सातत्याने हाताळत असतात.
महाराष्ट्रातील आणि अमेरिकेतीलही विविध नियतकालिकांमध्ये त्यांचे ललित लेख, माहितीपर लेख आणि कथा सातत्याने प्रकाशित होत असतात. ‘स्टोरी टेल’ या ऑडिओ बुकसाठीदेखील त्यांनी काही कथा लिहिलेल्या आहेत. गौतम व आशय जावडेकर यांची भेट झाल्यानंतर त्या दोघांनी ‘शँक्स’ हा लघुपट व ‘डी. एन. ए.’ हा चित्रपट यांच्या पटकथा परस्परसहकार्याने लिहिल्या आणि आशय जावडेकरांनी या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विशेषतः ‘डी. एन. ए.’ला परदेशातील विविध महोत्सवात चांगली दाद मिळाली आहे आणि आता हा चित्रपट फिल्म सोसायटीमुळे कोल्हापुरातील रसिकांनाही पाहता येणार आहे.
फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट यांनी ‘डी. एन. ए.’ या चित्रपटाविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, पालकत्व म्हणजे डी. एन. ए. म्हणजेच केवळ गुणसूत्रे पुढच्या पिढीकडे केवळ संक्रमित करणे नव्हे याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे.
from मनोरंजन https://ift.tt/xS8lErW
Post a Comment