झालं असं की, दोन दिवसांपूर्वी लंडनला जात असताना कुशल बद्रिकेने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यात कुशल सांगतो, मी एकट्याने कधीच सिनेमा पाहिलेला नाही, मध्यंतरात समोसा आणि पॉपकॉर्न शेअर करण्यात सिनेमापेक्षा जास्त मज्जा आहे अस मला नेहमी वाटतं. एवढंच काय तर एकटाच असा हॉटेलमध्ये जाऊन मी कधी जेवलेलो पण नाही, मला काय ऑर्डर करावं हेच सुचत नाही. अगदी असंच एकट्याने प्रवास करायला मला आवडत नाही. कदाचित मी स्वतःची कंपनी फार एन्जॉय करत नसेन. पण आज सिनेमाच्या शूटींगसाठी एकटं लंडनला जावं लागतय. इंटरनॅशनल प्रवासात, पृथ्वीचा व्यास ओलांडताना घड्याळाचा तासही बदलतो या गोष्टीचं मला आजही अप्रूप वाटत. खिडकीतून दिसणारे ढग, ढगांच्या चाळणीतून दिसणारा समुद्र, त्यातून डोकावणारा सूर्यप्रकाश. अवेळी रात्र या सगळ्यात कुणीतरी गप्पा मारणार हवं यार.पण आयुष्याच्या प्रवासात शेवटापर्यंत आपल्याला साथ करणारे फक्त आपणच असतो, काही लोक हाथ सोडवून घेतात तर काहींचे हाथ आपल्या हातून अलगद सुटतात, शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच करावा लागतो. मग एखादा विमान प्रवास एकट्याने करायला काय हरकत आहे, असा विचार मनात येतो. पण तरीही वाटतं…. किमान आंतरराष्ट्रीय प्रवासामधे आपल्या वाट्याचे 2-पेग प्यायला तरी कुणी हवं होतं….हॅप्पी जर्नी टू मी”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
त्याची ही पोस्ट व्हायरल झाली होती. मात्र या पोस्टवर एका वेबसाईटने ‘शेवटचा प्रवास मात्र एकट्यानेच… अभिनेता कुशल बद्रिकेच्या पोस्टने उडाली एकच खळबळ’, अशी बातमी चालवली. कुशलने ही बातमी वाचताच त्याबद्दल राग व्यक्त केला आहे. यावर आपली प्रतिक्रिया म्हणून त्याने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तो म्हणतो, माझ्या पोस्टवरून अशी बातमी करणारा माणूस कमाल आहे. असा माणूस सुखाने झोपू कसा शकतो, असा प्रश्नही त्याने विचारला आहे. देव यांना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थना केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor
from मनोरंजन https://ift.tt/Z2lrkF4
Post a Comment