अभिनेत्री राधिका आपटेने एका मुलाखती दरम्यान विविध गोष्टींवर रोखठोक भाष्य केलं आहे. राधिका आपटे म्हणाली,”बॉलिवूडमध्ये वयाला खूप महत्त्व आहे. तुमच्या अभिनयापेक्षा तु्म्ही किती तरुण दिसता या गोष्टीला इथे जास्त महत्त्व आहे. त्यामुळेच तरुण दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री सतत आपल्या शरीराच्या विविध भागांच्या सर्जरी करत असतात. मलादेखील अनेकदा सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पण मी सर्जरी केलेली नाही”. हो पण बॉलिवूडमध्ये वयाला खूप किंमत आहे. अनेक सिनेमांसाठी तरुण अभिनेत्रीच हव्या असतात हे सत्य नाकारता येणार नाही”, असे म्हणत बॉलीवूडबाबत तिने मोठा गौप्यस्फोट केला आहे. तर फक्त भारतीय सिनेसृष्टीतच नाही तर जगभरात अनेक महिला या गोष्टी विरोधात लढत असल्याचे तिने सांगितले आहे.
राधिका आपटेने आजवर हिंदी, मराठी, तेलगू, बेंगाली अशा विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. राधिकाचा ‘मोनिका, ओ माय डार्लिंग’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात ती राजकुमार राव आणि हुमा कुरेशीसोबत दिसली होती. याआधी ती सैफ अली खान आणि हृतिक रोशन स्टारर ‘विक्रम वेधा’ या बहुचर्चित सिनेमात झळकली होती. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात तिचे दोन्ही सिनेमे कमी पडले.
Edited by : Ratnadeep Ranshoor
from मनोरंजन https://ift.tt/3cgKew1
Post a Comment