https://ift.tt/DJky8L1
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. आता आमिर खानबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. आमिर खानने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आहे. आमिर खानने ही घोषणा केल्यापासून त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण त्याहीपेक्षा ते अभिनेत्याचा लेटेस्ट लूक पाहून आश्चर्यचकित झाले आहे. वास्तविक, आमिर खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो खूप म्हातारा दिसत आहे. या लूकमध्ये तो यापूर्वी कधीही दिसला नव्हता.
from मनोरंजन https://ift.tt/aekPJrf
आमिर खान अलीकडेच एका कार्यक्रमात दिसला होता. यावेळी तो ग्रे कलरचा ब्लेझर परिधान केलेला दिसला. आमिर दाढीच्या लूकमध्ये दिसत होता. यादरम्यान आमिर खूप म्हातारा दिसत होता. पांढरे केस आणि पांढरी दाढीमध्ये आमिरला पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.हा आमिरच्या नवीन चित्रपटाचा लूक असू शकतो! अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, आमिरने चित्रपटांपासून ब्रेक घेण्याची घोषणा करून चाहत्यांना धक्काच दिला आहे.
आमिर खानने कार्यक्रमादरम्यान 'चॅम्पियन्स' चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात तो अभिनय करणार नाही, तो फक्त त्याची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट एका स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यामध्ये तो मुख्य भूमिकेसाठी अभिनेत्याशी संपर्क साधणार असल्याचे सांगितले.
Edited by - Priya dixit
from मनोरंजन https://ift.tt/aekPJrf
Post a Comment