Rambha Car Accident: अभिनेत्री रंभाच्या कारला अपघात

https://ift.tt/jpVtDAq

rambha

Instagram

Rambha Car Accident: बंधन, जुडवा आणि क्रोध यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा एक भाग असलेल्या बॉलीवूडमधील रंभाच्या कारचा अपघात झाला आहे.या अपघातात तिच्या कारचे मोठे नुकसान झाले असून तिच्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.अपघाताच्या वेळी रंभा सोबत तिची मुले आणि तिची आया देखील कारमध्ये होती.रंभाच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

रंभाने पोस्ट करून सांगितले

अपघाताचे हे फोटो रंभाने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.फोटो शेअर करताना रंभाने लिहिले की, 'मुलांसह शाळेतून परत येत असताना चौरस्त्यावर एका कारने आमच्या कारला धडक दिली.गाडीत मी, मुले आणि आया होतो.आम्हा सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत पण आम्ही सुरक्षित आहोत.माझी धाकटी मुलगी साशा अजूनही रुग्णालयात आहे.वाईट दिवस आणि वाईट वेळ, कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा.तुमच्या प्रार्थना खूप महत्त्वाच्या आहेत.
Edited by : Smita Joshi



from मनोरंजन https://ift.tt/b6jDraq

Post a Comment

Previous Post Next Post