Photo - Twitter
बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते नितीन मनमोहन यांचे आज २९ डिसेंबर रोजी निधन झाले. नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आले होते. वयाच्या अवघ्या 62 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
3 डिसेंबरला हृदयविकाराचा झटका आला
वृत्ताप्रमाणे 3 डिसेंबरच्या संध्याकाळी निर्मात्याला हृदयविकाराचा झटका आल्यावर त्यांना मुंबईच्या कोकिला धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नितीन मनमोहन यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, त्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.
नितीन मनमोहन यांनी एकापेक्षा एक चित्रपट दिले
नितीन मनमोहन यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक चित्रपट दिले. लाडला, यमला पगला दीवाना, बोल राधा बोल, लव के लिए कुछ भी करेगा, दस, चल मेरे भाई, नई पडोसन, बागी, एना मीना दीका, टँगो चार्ली, दिल मांगे मोर असे अनेक चित्रपट त्यांनी दिले.
टीव्ही सीरियलमध्येही काम केले
अभिनेता म्हणून नितीनने भारत के शहीद या टीव्ही मालिकेत चंद्रशेखर आझाद यांची भूमिका साकारली होती. नितीन हा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते मनमोहन यांचा मुलगा आहे. मनमोहन 'ब्रह्मचारी', 'गुमनाम' आणि 'नया जमाना' यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात.
from मनोरंजन https://ift.tt/nM8DGzB
Post a Comment