जंगलात फिरण्याची खरी मजा तिथे मिळते. सदाहरित प्रकारचे हे जंगल आहे. दक्षिण भारतातले चेरापुंजी अशी आगुंबेची ओळख आहे. रोज सकाळी घड्याळाच्या गजरामुळे कशीबशी येणारी जाग, इथे पक्षांच्या किलबिलाटाने येते.
आगुंबेपासून साधारण तीन कि.मी. वर 'जोगी गुन्डी' धबधबा आहे. हा धबधबा म्हणजे तुंगा नदीची उपनदी असलेल्या मालपहारी नदीचे उगमस्थान. 'जोगी गुन्डी' पासून साधारण चार कि.मी. पुढे गेल्यावर बरकाना पठार आहे. समुद्रसपाटीपासून साधारण दोन हजार फूट उंच असे बरकाना पठार, निसर्गाच्या मोठेपणाचा एक वेगळा अनुभव देऊन जाते. ट्रेकला जाण्यासाठी बरकाना हे एक मस्त ठिकाण आहे. बरकाना म्हणजे माऊस डिअरचे घर, बरका म्हणजे माऊस डिअर आणि काना म्हणजे घर.
आगुंबेपासून जवळच सोमेश्वरा वन्यजीव अभयारण्य आहे. हिल मैना, मलबार पाईड हॉर्नबिल, स्कार्लेट मिनिवेट, पॅराकिट असे अनेक पक्षी इथे दिसतात. याशिवाय ब्लू ऑक्लिफ, ऑरेंज ऑक्लिफ, सदर्न बर्ड-विंग अशी इतर ठिकाणी सहसा न दिसणारी फुलपाखरेही दिसतात. ब्लॅक पॅन्थर, किंग कोब्रा असे अनेक दुर्मीळ होत चाललेले प्राणीही इते आहेत.
राहण्याची सोय
आगुंबेमध्ये राहण्यासाठी हॉटेल्स किंवा लॉज नाहीत, पण गावामध्ये काही जण राहण्याची सोय करता.
कसे जाल?
आगुंबेला जाण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये प्रवास करावा लागतो, बेळगाव, बेळगाव ते शिमोगा आणि पुढे शिमोगा ते आगुंबे.
from मनोरंजन https://ift.tt/TMXQkms
Post a Comment