ऑनलाइन रेखाकलेची 'परीक्षा'; ऑफलाइनपेक्षा ऑनलाइनला दुप्पट शुल्क

https://ift.tt/C6RSAQz
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद कला संचालनालयातर्फे शासकीय रेखाकला ऑनलाइन परीक्षा () होणार आहे. परीक्षेबाबतची नियमावली, दुप्पट शुल्कामुळे विद्यार्थी, पालकांना परीक्षा प्रक्रिया अडथळ्यांची ठरते आहे. ऑफलाइनपेक्षा ऑनलाइनचे शुल्क दुप्पट आकारण्यात येत आहे. त्याचवेळी नोंदणीसाठी रहिवासी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. त्याची प्रक्रिया करण्यासाठी पालकांचा वेळ आणि पैसा खर्ची होतो आहे. तर नोंदणीसाठी तांत्रिक अडचणीही येत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. संचालनालयाने करोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेत परीक्षा ऑनलाइन होईल असे स्पष्ट केले. एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावीला सवलतीचे गुण मिळतात. त्यासह कला महाविद्यालयातील प्रवेशासाठी परीक्षा उपयुक्त ठरते. दरवर्षी परीक्षेला सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी बसतात. २०२१-२२ शैक्षणिक वर्षामध्ये दहावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २२ व २३ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. यासह कला संचालनालयाच्या अंतर्गत शासकीय, अशासकीय कला महाविद्यालयात २०२१-२२मध्ये मुलभूत, कला शिक्षक प्रशिक्षण पदविका प्रथम वर्ष अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेला बसता येणार आहे. परीक्षेसाठी नोंदणीची प्रक्रिया शनिवार १२ फेब्रुवारीपासून सुरू झाली. २० फेब्रुवारीपर्यंत त्याची मुदत असणार आहे. पहिल्याच दिवशी नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना अडचणी आल्याचे कला शिक्षकांनी सांगितले. तांत्रिक अडचणींसोबत नियमावली, शुल्कावरूनही शिक्षकांमध्ये नाराजी आहे. तर काही संघटनांनी ऑनलाइन परीक्षेला विरोध केला आहे. शुल्कवाढ, प्रमाणपत्राची अडचण ऑफलाइन परीक्षेसाठी शंभर रुपये परीक्षा शुल्क आकारले जाते. ऑनलाइन परीक्षेसाठी हे शुल्क दोनशे रुपये करण्यात आल्याबद्दल शिक्षकांमध्ये नाराजी आहे. ऑफलाइनसाठी सोयीसुविधा, परीक्षेच्या कामकाजात शिक्षक, कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षात घेऊन शंभर रुपये आकारणी होते. त्यातुलनेत ऑनलाइनचा खर्च कमी असताना शुल्क दुप्पट कसे, असा प्रश्न शिक्षक, संघटना उपस्थित कीत आहेत. नोंदणी करताना रहिवासी प्रमाणपत्रही विद्यार्थ्याला द्यावे लागणार आहे. अनेक पालकांनी अशा प्रकारचे प्रमाणपत्र काढलेले नाही. प्रमाणपत्रकाची प्रक्रिया खर्चिक आहे. अशा वेळी पालकांना बुर्दंड कशाला असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. ऑनलाइन परीक्षेला विरोधही होत आहे. ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात सोयीसुविधांचा विचार करता अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहतील त्यामुळे परीक्षा ऑफलाइन घ्याव्यात अशी मागणीही पुढे आली आहे. इंटरएमिजिएट ग्रेड परीक्षा करोना पार्श्वभूमीवर ऑफलाइनऐवजी ऑनलाइन होत आहेत. परीक्षेचे शुल्क शंभर वरून दोनशे रूपये करण्यात आले. परीक्षेसाठी रहिवाशी प्रमाणपत्राची अटही अनावश्यक आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी लिंक उपलब्ध करून दिली, ती उघडत नाही. परीक्षेबाबत कला संचालनालयाचा सावळा गोंधळ आहे. प्रल्हाद शिंदे, कलाशिक्षक महासंघ सध्या १०वीचे विद्यार्थी सराव पेपर, विज्ञान प्रात्यक्षिक तयारी यात व्यस्त आहेत. म्हणून घोषित वेळापत्रकानुसार ऑनलाइन परीक्षा घेणे अडथळ्याचे ठरणार आहे. ग्रामीण भागात इंटरनेटच्या अडचणी येणार. त्यात शुल्कही दुप्पट केले. मागील वर्षी प्रमाणे प्रक्रिया करू शकतात किंवा १०वी परीक्षा झाल्यानंतर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यायला हवी. विश्वनाथ ससे, कला संघटना


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kPNWg92

Post a Comment

Previous Post Next Post