https://ift.tt/DgZj1Jl
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lBdksQr
Board: शिक्षण मंत्रालयातील अपर सचिव विनीत जोशी () यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार ( of CBSE Chairman) सोपवण्यात आला आहे. सीबीएसईचे माजी अध्यक्ष मनोज आहुजा (Manoj Ahuja, Ex Chairman of CBSE) यांची कृषी आणि शेतकरी कल्याण विभागात ओएसडी (OSD Department of Agriculture and Shetkari Welfare) म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर जोशी यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव विनीत जोशी यांची १४ फेब्रुवारी २०२२ पासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर विनीत जोशी हे आयएएस मनोज आहुज यांची जागा घेतील. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने ही माहिती दिली आहे. जारी केलेल्या अधिकृत नोटीसनुसार, मनोज आहुजा, आयएएस (ओआर: १९९०) यांना १४ फेब्रुवारी रोजी सीबीएसईच्या अध्यक्ष पदावरून मुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी विनीत जोशी अतिरिक्त सचिव, उच्च शिक्षण विभाग प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. विनीत जोशी हे नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (National Testing Agency, NTA) मुख्य सदस्य आहेत. मूळचे उत्तर प्रदेशचे असलेल्या विनीत यांनी अलाहाबादमधील अॅनी बेझंट स्कूल आणि जीआयसीमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी आयआयटी कानपूरमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर डिग्री आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. विनीत जोशी हे मणिपूरचे १९९२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आयएएस म्हणून त्यांनी मणिपूरमधील युवा व्यवहार आणि क्रीडा विभागात सेवा सुरू केली. १९९९ मध्ये ते युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयात खासगी सचिव म्हणून रुजू झाले. २००० ते २००२ पर्यंत ते अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयात खासगी सचिव होते. २०१० च्या अखेरीस त्यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. विनीत जोशी हे सध्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे सदस्य आहेत. ते सीबीएसईच्या अध्यक्षपदाचा तात्काळ प्रभावाने पदभार स्वीकारतील. त्यांना अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. आयएएस मनोज आहुजा यांचा कार्यकाळ दुसरीकडे आएएस मनोज आहुजा हे ओडिशा केडरचे १९९० च्या बॅचचे नागरी सेवक आहेत. त्यांना १२ मे २०२२ रोजी सीबीएसईचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. त्यांचा कार्यकाळ सोमवारी संपला. त्यांनी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरीचे विशेष संचालक म्हणूनही काम केले आहे. त्यांना आता कृषी मंत्रालयात विशेष नियुक्ती देण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/lBdksQr
Post a Comment