SSC HSC Exam 2022: एसटी संपामुळे परिक्षार्थींचे हाल

https://ift.tt/zZBKJ6r
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा () फटका ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. आता बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्या आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षाही सुरू होणार आहेत. या विद्यार्थ्यांचे एसटीअभावी () प्रचंड हाल होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. सुरू असल्याने ग्रामीण भागात वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. कोकणासह राज्यातील अन्य ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या अथवा नजिकच्या शहरात यायचे झाल्यास खासगी वाहतूक व्यवस्थेवर अथवा गावातील गाडी असलेल्या एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहावे लागत आहे. यामध्ये गावापासून पाच ते दहा किलोमीटर अंतरावर शाळा असलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यातच आता बारावीची परीक्षाही सुरू झाली आहे. लवकरच दहावीची परीक्षाही सुरू होणार आहे. या परीक्षार्थींना प्रवासात काही अडचण आल्यास आणि परीक्षा हुकल्यास पर्याय काय, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. अनेक गावांतील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्याची जबाबदारी गावात ज्यांच्याकडे गाडी आहे अशा व्यक्तींनी घेतली आहे. यंदा शाळेतच परीक्षा केंद्र असल्याने विद्यार्थ्यांना लांबवर प्रवास करावा लागणार नाही. मात्र ग्रामीण भागात दहावी व बारावीच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये किमान सात ते दहा किलोमीटरच्या अंतरावर आहेत. हे अंतर कापण्यासाठी वाहनाची आवश्यकता लागतेच. अनेक विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडून जावे लागत असल्याने जीवही धोक्यात घालावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी वाहनव्यवस्था व्हावी या उद्देशाने एसटी महामंडळाला पत्र लिहिणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. दरवर्षी परीक्षेच्या कालावधीत असे पत्र महामंडळाला दिले जाते. यंदाही दिले जाईल, असेही गोसावी म्हणाले. दरम्यान, लेखी परीक्षा सुरू होईपर्यंत एसटीचा संप मागे घेतला जाईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत. तसे झाल्यास विद्यार्थ्यांना नक्कीच दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BiHDjqO

Post a Comment

Previous Post Next Post