विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! आयुर्वेद रुग्णालयात आता वर्षभर 'इंटर्नशिप'

https://ift.tt/aw784lV
पुणे : ''च्या वैद्यकीय अभ्यासक्रमांतर्गत नव्याने तीन शैक्षणिक वर्षांच्या रचनेत आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या संलग्नित रुग्णालयातच सहा महिन्याऐवजी संपूर्ण वर्षभर प्रॅक्टिस (Internship) करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी डॉक्टरांना रुग्णपरिक्षणाचा अधिक अनुभव मिळणे शक्य होणार आहे. 'बीएएमएस'च्या अभ्यासक्रमाच्या रचनेसह कॉलेजच्या शिक्षकांच्या बदलांबाबत नॅशनल कौन्सिल ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीनने (एनसीआयएसएम) म्हणजेच भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने काढलेली अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आयुर्वेद विश्वात बदलाचे वारे वाहू लागले आहे. या बदलांबाबत आयुर्वेद विश्वातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पूर्वी आयुर्वेदाची 'बीएएमएस'ची पदवी संपादन करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना साडेचार वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर आणखी एक वर्ष खर्च करावे लागत होते. त्यापैकी सहा महिने ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 'इंटर्नशिप' करण्याची मुभा देण्यात आली होती. उर्वरित सहा महिने कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याची संधी होती. परंतु, त्यावेळी अनेकदा पदवी झालेले विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण (पीजी) घेण्याच्या तयारीत असतात. रुग्णसंख्या कमी असलेल्या अथवा रुग्ण कार्यरत नसणाऱ्या ग्रामीण रुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करून, तेथे फिरकायचे नाही. दुसरीकडे पीजीच्या शिक्षणाची तयारी करीत रहायचे, अशी विद्यार्थ्यांची पद्धत होती. त्यामुळे 'इंटर्नशिप'चा उद्देश पुरेशा प्रमाणात यशस्वी होत नसल्याचे आढळून आले. त्याला फाटा देण्यासाठीच आता दीड वर्षाचे शैक्षणिक वर्ष करताना संपूर्ण वर्षभर 'इंटर्नशिप' करण्याची मुभा देण्यात आली आहे. आयुर्वेद कॉलेजच्या संलग्नित रुग्णालयात शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करण्याची संधी मिळणार आहे. परिणामी, वर्षभर रुग्णालयात प्रॅक्टिस करण्याची संधी मिळाल्याने डॉक्टरांचे रुग्णपरीक्षण वाढण्यास मदत होणार आहे. या 'इंटर्नशिप'च्या बदलाबाबत प्राध्यापक-विद्यार्थ्यांमधून स्वागत होत आहे. अभ्यासक्रमात संशोधनावर भर 'एनसीआयएसएम'ने नव्या बदलांमध्ये आय़ुर्वेदाच्या शिक्षणात संशोधनात्मक शिक्षणावर भर दिला आहे. पूर्वी आयुर्वेद शिक्षणात संशोधनावर भर दिला नव्हता. आता दीड वर्षाच्या शैक्षणिक वर्षामध्ये तिसऱ्या वर्षी संशोधन विषय सक्तीचा करण्यात आला आहे. या नव्या बदलामुळे आयुर्वेदाचे अधिकाधिक विद्यार्थी संशोधनाकडे वळतील; तसेच त्यांना आयुर्वेदातील संशोधनाची आवड निर्माण होईल. त्यांचा संशोधनात सहभाग वाढेल, या हेतूने 'एनसीआयएसएम'ने अभ्यासक्रमात बदल केल्याचे जाणकार सांगत आहेत. निकष बदलांना प्राध्यापकांचा विरोध आय़ुर्वेद कॉलेजातील प्राध्यापकांच्या निवडीचे पूर्वी काही निकष होते. ते निकष थोडेसे शिथिल करण्यात आले आहेत. त्याबाबत प्राध्यापकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अॅनाटॉमी (शरिररचनाशास्त्र), फिजिओलॉजी आणि आयुर्वेदाचा संहिता सिद्धांत या तीन विषयांसाठी एमएस्सी अॅनाटॉमी, एमएस्सी फिजिओलॉजी आणि एमएस्सी आयुरबायोलॉजी या विषयांतील प्राध्यापकांना नियुक्त करण्याची तरतूद नव्या अधिसूचनेनुसार करण्यात आली आहे. स्वस्थवृत्त या विषयासाठी 'एमपीएच' कोर्स झालेल्या व्यक्तींना नियुक्त करण्याची सोय झाली आहे. आयुर्वेद, फिजिओलॉजी, अॅनाटॉमी, स्वस्थवृत्त या विषयांत एमडी झालेल्या प्राध्यापकांच्या नियुक्तीचे निकष बदलण्यात आले आहेत. त्याबाबत प्राध्यापकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे एमडी आयुर्वेद, एमडी युनानी असलेल्या प्राध्यापकांना त्या त्या विषयासाठी नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी आयुर्वेद टिचर असोसिएशनसह अन्य प्राध्यापांनी केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hwLyxc1

Post a Comment

Previous Post Next Post