MPSC मधून अधिकारी झाल्याचा बनाव करणाऱ्यांवर आयोगाकडून कारवाई

https://ift.tt/f4MFDQu
Fake Officer: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन (Maharashtra Public Service Commission, MPSC) अधिकारी झाल्याचे सांगून काही उमेदवार सर्वांची फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याची दखल घेऊन अशा मंडळींना दणका दिला आहे. लोकसेवा आयोगाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन यासदंर्भात माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या परीक्षांमधून अधिकारी म्हणून निवड झाल्याची बनावट कागदपत्रे काही व्यक्तींकडून तयार करण्यात आली. या बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन त्याआधारे काही व्यक्ती समाजाची दिशाभूल करत आहेत. तसेच लोकांची फसवणुक केल्याचे प्रकार घडत होते. यासंदर्भातील तक्रारी येत होत्या. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आयोगातर्फे कारवाई करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील एका दुकानदार व्यक्तीने राज्यकर निरीक्षक/राज्यकर उपायुक्त पदावर आयोगाकडून निवड झाली असल्याचे भासविले आहे. तसेच वस्तू व सेवा कर विभागाकडून नियुक्ती झाल्याच चित्र निर्माण केले. या खोट्या माहितीच्या आधारे त्या दुकानदार व्यक्तीने अनेक संस्थांकडून सत्कार स्विकारल्याचे उघड झाले आहे. यामाध्यमातून त्याने विविध संस्था आणि वर्तमानपत्र यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या व्यक्ती यांच्यावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/OT42qkN

Post a Comment

Previous Post Next Post