MPSC कडून ग्रुप बी परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर

https://ift.tt/MVJjc0z
2021: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अराजपत्रित अधीनस्थ सेवांसाठी (non-gazetted subordinate services) ग्रुप बी प्रिलिम्स परीक्षा २०२१ चे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर ग्रुप बी पूर्व परीक्षा प्रवेशपत्र अपलोड करण्यात आले आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार येथे जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्रामध्ये परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्र, वेळ मर्यादा इत्यादी तपशील देण्यात आला आहे. एमपीएससी ग्रुप बी परीक्षा २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील ३६ जिल्हा मुख्यालयांमध्ये घेतली जाणार आहे. एमपीएससी ग्रुप डी परीक्षेत जास्तीत जास्त १०० गुणांना अनुमती आहे. प्रवेशपत्र आणि परीक्षेबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवार एमपीएससीची अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर भेट देऊ शकतात. एमपीएससी ग्रुप बी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना पुढील स्टेप्स फॉलो करावे लागतील. प्रवेशपत्र असे डाउनलोड करावे एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in वर जा. 'प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड करा' या लिंकवर क्लिक करा. क्रेडेन्शियल्स एंटर करा आणि ओटीपी पद्धत वापरून लॉग इन करा. स्क्रीनवर हॉल तिकीट दिसेल. पीडीएफ फाइल डाउनलोड करा किंवा भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ६६६ रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. परीक्षेसाठी महत्त्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, अनुभव, पात्रता निकष आणि इतर तपशील वेबसाइटवर देण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑक्टोबर २०२१ पासून सुरु झाली आहे. तसेच १९ नोव्हेंबर २०२१ ही ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख होती. ऑनलाइन शुल्क भरण्याची आणि चलनाची पावती देण्याची शेवटची तारीख देखील १९ नोव्हेंबर २०२१ आहे. एसबीआय चालानद्वारे शुल्क भरण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२१ होती. एमपीएससी पूर्वपरीक्षा २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Awd0NkY

Post a Comment

Previous Post Next Post