वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकला; निवासी डॉक्टरांची मागणी

https://ift.tt/4JyloPi
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, याकरिता एमडी, एमएस (MD, MS Exams) या वैद्यकीय पदव्युत्तर शाखांच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली आहे. बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्षाचे निवासी डॉक्टर १० ते २० मार्चदरम्यान रुजू होतील. या नव्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना किमान महिनाभर पुरेसे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या दिशानिर्देशांनुसार, विद्यापीठ परीक्षेला बसण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्याने तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, समुपदेशन प्रक्रियेतील विलंबामुळे सध्या परीक्षा होणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा कालावधी पूर्ण झालेला नाही. दुसरीकडे पदव्युत्तर शिक्षकांचे आंदोलन सुरू असल्याने अनेक निवासी डॉक्टरांचे 'थीसिस' सादरीकरण व्हायचे आहे. विशेष म्हणजे हे विद्यार्थी अजूनही कोव्हिड तसेच नियमित वैद्यकीय कामातून अजून मोकळे झालेले नाहीत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून ही परीक्षा किमान ४ ते ५ आठवडे पुढे ढकलावी, अशी मागणी सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहीफळे, सरचिटणीस डॉ. सजल बंसल यांनी कुलगुरूंकडे केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kNf1j2q

Post a Comment

Previous Post Next Post