BMC Recruitment: मुंबई महानगरपालिकेत भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

https://ift.tt/rZP61Ln
BMC Recruitment: मुंबई महानगरपालिकेत (BMC ) नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (Municipal Corporation of Greater Mumbai) आरोग्य विभागाअंतर्गत (Health Department Job) विविध पदे भरली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (MCGM Recruitment) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागातील न्यूरो सर्जन, गायनॅक, ईएनटी या डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदाची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण ५ पदे भरली जाणार आहेत. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्या. असिस्टंट प्रोफेसर न्यूरो सर्जरी डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेतून न्यूरो सर्जरीमध्ये एम.सीएच असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १ लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे. स्त्रीरोग आणि प्रसुती शास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेतून एमएससी(Oto-RhinoLaryngology) पर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १ लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे. ईएनटी विभागात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेतून Oto-RhinoLaryngology मध्ये एमएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १ लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना डीन ऑफिस,लोकमान्य टिळक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, सायन मुंबई -४०००२२ या पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. १४ मार्च आणि १५ मार्च २०२२ रोजी या मुलाखती होणार आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0nUJgtM

Post a Comment

Previous Post Next Post