Board Exams 2022: जेईई मेन परीक्षेमुळे 'या' बोर्डांनी बदलले वेळापत्रक

https://ift.tt/bHXAl4t
Board : जेईई मेन परीक्षेच्या ( 2022) तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी बसतात. दरम्यानच्या काळात अनेक राज्य मंडळानी () परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. यातील अनेक परीक्षा जेईई मेन परीक्षेच्या तारखांशी क्लॅश होत होत्या. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांच्या बोर्डांनी परीक्षांच्या तारखा बदलण्याची घोषणा केली आहे. सर्वप्रथम कर्नाटक राज्य मंडळाने वेळापत्रकात बदल केला. त्यानंतर तेलंगणा राज्य मंडळानेही परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. जेईई मेन्ससाठी नोंदणीची प्रक्रिया १ मार्चपासून सुरू झाली असून ती ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. जेईई मेन परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून सातत्याने वेळापत्रकात बदल करण्याची मागणी होत होती. बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एज्युकेशन आंध्र प्रदेश, (BIEAP) ने आंतरराज्य प्रथम आणि द्वितीय वर्ष परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. आता २२ एप्रिल ते १२ मे २०२२ या कालावधीत त्यांच्या परीक्षा होणार आहेत. जेईई मेन्स परीक्षा १६ ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येईल. देशभरातून लाखो विद्यार्थी जेईई मेन परीक्षेला बसतात. विद्यार्थ्यांना या नवीन तारखांची माहिती करुन घ्यावी आणि त्यानुसार तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या मंडळांच्या वेळापत्रकामध्ये बदल पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाची परीक्षा (WBBSE) ही जेईई मुख्य परीक्षेशी (JEE Mains 2022) क्लॅश होत असल्यामुळे WBBSE HS म्हणजेच बारावी परीक्षेच्या तारखा बदलण्याची शक्यता आहे. तेलंगणा स्टेट बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एज्युकेशन (TSBIE) ने जेईई मेन्स २०२२ च्या तारखा क्लॅश झाल्यामुळे परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार, तेलंगणा बोर्डाची पहिल्या वर्षाची परीक्षा २२ एप्रिल ते ११ मे २०२२ या कालावधीत घेतली जाईल तर TS द्वितीय वर्षाची परीक्षा २३ एप्रिल ते १२ मे २०२२ या कालावधीत होईल. यापूर्वी टीएस इंटरमीडिएट (Telangana Inter Exam) द्वितीय वर्षाच्या परीक्षा २१ एप्रिल ते १० मे २०२२ या कालावधीत होणार होत्या. कर्नाटक प्री युनिव्हर्सिटी एज्युकेशन डिपार्टमेंट (PUC Karnataka) ने बोर्ड परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. कर्नाटक बोर्डाची बारावीची परीक्षा यापूर्वी १६ एप्रिल २०२२ पासून होणार होती. मात्र आता या परीक्षा २२ एप्रिल २०२२ पासून घेतल्या जाणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/VA9rY8M

Post a Comment

Previous Post Next Post