PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड पालिकेत महिलांना नोकरीची संधी

https://ift.tt/wx1c5bX
PCMC Recruitment 2022: नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये () आरोग्य सेविका () पदांची भरती होणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पिपंरी चिंचवड पालिकेच्या कॉर्पोरेशन हेल्थ अॅण्ड फॅमिली वेल्फेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) सुरु आहे. यासाठी आरोग्य सेविका (एएनएम) पदाच्या ८८ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी थेट मुलाखतीतून महिला उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. आरोग्य सेविका पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या महिला उमेदवाराकडे एएनएम कोर्स उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र नर्सिंग काऊन्सिलकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १८ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नसून थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. १६ आणि १७ मार्च २०२२ रोजी ही मुलाखत होणार आहे. मुलाखतीला येताना उमेदवारांनी उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि एएनएस शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/GCg8j6H

Post a Comment

Previous Post Next Post