RKVY 2022: रेल्वे कौशल्य विकास योजनेतून विनामुल्य शिका विविध कोर्स, 'येथे' करा अर्ज

https://ift.tt/1K9RZqN
RKVY 2022: रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे कौशल्य विकास योजनेसाठी (Railway Skill Development Scheme, RKVI) अर्जाची प्रक्रिया १२ मार्च २०२२ पासून सुरु झाली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये स्थापन केलेल्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये अनेक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (Skill Development Training Program) सुरु आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार railkvy.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांना २५ मार्च २०२२ रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या योजनेंतर्गत एसी मेकॅनिक, कारपेंटर, सीएनएसएस (कम्युनिकेशन नेटवर्क अँड सर्व्हिलन्स सिस्टम), कॉम्प्युटर बेसिक, काँक्रीटिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स), मशीनिस्ट, रेफ्रिजरेशन आणि एसी, टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्स, ट्रॅक लेइंग, वेल्डिंग, बार बेंडिंग आणि बेसिक्स ऑफ आयटी आणि एस अँड टी च्या मूलभूत गोष्टींच्या अभ्यासक्रमांसाठी तीन आठवडे (१८ दिवस) प्रशिक्षण दिले जाते. रेल्वे कौशल्य विकास योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळातून दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ११ मार्च २०२२ पर्यंत उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. RKVY training 2022: निवड प्रक्रिया रेल्वे मंत्रालयाच्या कौशल्य आधारित प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड दहावीतील गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाणार आहे. निर्धारित कालावधीनंतर, उमेदवारांना लेखी चाचणी आणि प्रात्यक्षिक परीक्षेत बसावे लागेल. ज्यामध्ये अनुक्रमे ५५ टक्के आणि ६० टक्के गुण मिळालेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. प्रशिक्षण विनामूल्य रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, उमेदवारांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शुल्क जमा करण्याची आवश्यकता नाही. असे असले तरीही उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत निवास आणि भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागेल. तसेच प्रशिक्षणासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/x7TiRja

Post a Comment

Previous Post Next Post