आलियाला रुग्णालयातून डिस्चार्ज, रणबीर मुलीला घरी नेत असतानाचा व्हिडिओ व्हायरल

https://ift.tt/FDaqgzu

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मुलीला जन्म दिल्यापासून चर्चेत आहे. काही चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे अभिनंदन करत आहेत, तर काही कपूर कुटुंबाची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत. दरम्यान आलिया भट्ट आणि रणबीरचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर आलिया भट्ट आणि त्याच्या मुलीला कारमधून घरी घेऊन जात आहे.

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट बाळाला घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसली. आलिया आणि रणबीरच्या मुलीची झलक मात्र कोणालाही दिसू नये याची पूर्ण काळजी घेतली गेली.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आलिया भट्टला मुलीला जन्म दिल्यानंतर चार दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ती गुरुवारी सकाळी आपल्या मुलीसह घरी परतली. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर आपल्या मुलीला मीडियापासून लपवताना दिसत आहे. त्याचबरोबर आलिया भट्ट ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार नीतू कपूर आलिया आणि मुलीच्या स्वागतासाठी रणबीरच्या घरी पोहोचली आहे.

 

आलियाने 6 नोव्हेंबर रोजी एका मुलीला जन्म दिला, त्यानंतर तिने इंस्टाग्रामवर लहान परीचं स्वागत करत एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली. रिपोर्ट्सनुसार रणबीरने आपल्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतले तेव्हा त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.



from मनोरंजन https://ift.tt/qYl8hts

Post a Comment

Previous Post Next Post