कांतारा पुन्हा आला चर्चेत; मिळणार हा विशेष पुरस्कार

https://ift.tt/LFyR4Jj

२०२२मध्ये सुपरहिट ठरलेल्या रिषभ शेट्टीच्या ‘कांतारा’चित्रपटाची चर्चा अजूनही संपत नाही. संपूर्ण भारतभर गाजलेल्या या चित्रपटाने अनेकांची मने जिंकली. यामध्ये प्रमुख भूमिका निभावलेल्या अभिनेता रिषभ शेट्टीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. त्याने मुख्य भूमिकेसोबतचे चित्रपटाच्या दिग्दर्शकाचीही भूमिका निभावली होती. एवढचं नव्हे तर १०० दिवस चित्रपटगृहात राहणार या चित्रपटाने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले. आता या चित्रपटाने आपल्या मानाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला आहे.

 

२० फेब्रुवारीला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. यावेळी रिषभ शेट्टीला ‘मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेता’ म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. २०१९ मध्ये हा पुरस्कार ‘केजीएफ’फेम अभिनेता यशला देण्यात आला होता. ‘कांतारा’ हा फक्त १६ कोटींमध्ये बनलेला चित्रपट आहे. याने बॉक्स ऑफिसवर तब्बल ४५० कोटींवर कमाई करत अनेक विक्रम मोडीत काढले. त्यानंतर नुकतेच रिषभ शेट्टीने ‘कांतारा’च्या प्रीक्वलची घोषणा केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor



from मनोरंजन https://ift.tt/HPQNBhU

Post a Comment

Previous Post Next Post