अमृता खानविलकरने नवऱ्याला केले ब्लॉक

https://ift.tt/lB4iz2J

amruta khanvalkar

सध्या सिनेसृष्टीत लग्नसोहळ्यांचा हंगाम आहे. एकीकडे जोड्या जुळत असतानाच अभिनेत्री अमृता खानविलकरने मात्र तिच्या चाहत्यांना एक धक्का दिला आहे. अमृता खानविलकर आणि हिमांशु मल्होत्राकडे क्युट कपल म्हणून पाहिले जाते. काही महिन्यांपूर्वीच अमृताने हिमांशु आणि आपल्या मित्रमंडळींसोबत जोरदार वाढदिवस साजरा केला होता. मात्र आता अमृताने हिमांशुला सोशल मीडियावरून ब्लॉक केले आहे. त्यामुळे त्यांच्यात सगळं आलबेल आहे की, नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबद्दलचा खुलासा अमृताने प्लॅनेट मराठीवरील 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॅाक शोमध्ये केला आहे. अमृताने अनेकदा हिमांशुला ब्लॉक आणि अनफॉलो केले आहे. मात्र यावेळी हिमांशुने अमृताला अनफॉलो केले आहे, त्यांच्यात नेमकं काय घडलं, ते असं का करतात, याचे उत्तर प्रेक्षकांना शुक्रवारी म्हणजेच १० फेब्रुवारी मिळेल. माझ्या पप्पांनी मला आतापर्यंत डान्स करताना बघितले नसल्याही खंतही यावेळी अमृताने व्यक्त केली. 'पटलं तर घ्या विथ जयंती'मध्ये अमृताने अनेक गोष्टी गंमतीदार किस्से, खटकणाऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत. या गप्पाटप्पांमध्ये दिग्दर्शक ओम राऊतही सहभागी झाला असून अमृता आणि तो ‘बर्गर बडीज’ असल्याचे गुपित त्याने यावेळी सांगितले. 


from मनोरंजन https://ift.tt/9iJ1CB2

Post a Comment

Previous Post Next Post