युक्रेनमध्ये अडकले मराठी विद्यार्थी; युद्धाचा भडका उडाल्याने उठले चिंतेचे काहूर

https://ift.tt/N8n65w7
रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला आहे. युद्धकाळातील ( ) सायरनचे आवाज धडकी भरवत आहेत. टीव्ही चॅनेल्सच्या माध्यमातून भारतातील घराघरात हे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनच्या आकाशात धूर आणि धुराचे लोट पाहून महाराष्ट्रातील कुटुंब देखील घाबरली आहेत. कारण युक्रेनमध्ये २ मराठी विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. अदिती देशमुख आणि प्रतिक जोंधळे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे विद्यार्थी नाशिकरोड व गंगापूर रोडचे रहिवासी असल्याचे समजते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने () दिली आहे. या विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. युक्रेनमधून भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी ७२ तासांपूर्वी ऑपरेशन सुरू केले. पण हल्ला सुरू झाल्यानंतर ते थांबवावे लागले आहे. युक्रेनला निघालेले एअर इंडियाचे विमान दिल्लीला परतत असल्याची बातमी आज सकाळी आली. एअर इंडियाच्या AI1947 या विमानाने मंगळवारी पहिल्यांदाच नवी दिल्ली ते कीवसाठी उड्डाण केले. २४० हून अधिक भारतीयांना धोकादायक परिस्थितीत घरी आणण्यात आले. 256-सीटचे बोईंग 787 ड्रीमलाइनर हे विमान गेले होते. या आठवड्यात आज गुरुवार आणि शनिवारी आणखी दोन उड्डाणे केली जाणार होती. पण आता हल्ला सुरू झाल्यानंतर ती थांबवावी लागली आहे. रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर भारत सरकारचे प्राधान्य आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशात आणण्याचे आहे. हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर भारत आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या पर्यायांवर विचार करत आहे. भारतीय दुतावास नवी दिल्लीशी सतत संपर्कात आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Wgnu09s

Post a Comment

Previous Post Next Post