JEE Advanced २०२२ परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 'या' तारखेपासून, पाहा संपूर्ण वेळापत्रक

https://ift.tt/xKHBofL
2022: संयुक्त प्रवेश परीक्षा २०२२ (JEE Advanced) नोंदणी अपडेटची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Bombay) ने जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणीची तारीख जाहीर केली आहे. याची नोंदणी प्रक्रिया ८ जूनपासून सुरू होईल आणि १४ जूनला संपेल. जेईई अॅडव्हान्स परीक्षा ३ जुलै २०२२ रोजी घेतली जाणार आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार जेईई अॅडव्हान्स २०२२ च्या नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in ला भेट देऊ शकतात. जेईई अॅडव्हान्स २०२२ वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत उमेदवारांची फी भरण्याची अंतिम तारीख १५ जून २०२२ आहे. जेईई अॅडव्हान्स २०२२ () प्रवेशपत्र २७ जूनपासून अधिकृत जेईई अॅडव्हान्स वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल. उमेदवार जुलैपर्यंत प्रवेशपत्र (Jee Advanced Admit Card) डाउनलोड करू शकतात. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. उमेदवारांना पेपर १ मध्ये उपस्थित राहण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १२ आणि पेपर २ साठी दुपारी २.३० ते ५.३० पर्यंत वेळ देण्यात येईल. १८ जुलैपर्यंत निकाल परीक्षा संपल्यानंतर ९ जुलैपर्यंत प्रोव्हिजनल उत्तरतालिका वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. जेईई अॅडव्हान्स २०२२ च्या निकालासह अंतिम उत्तरतालिका १८ जुलैपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. भारतीय नागरिकांना जेईई अॅडव्हान्स २०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी २,८०० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. राखीव प्रवर्ग आणि महिला उमेदवारांसाठी शुल्कात सवलत देण्यात आली आहे. महिला उमेदवार, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) समुदायातील उमेदवार आणि अपंग व्यक्ती (PWD) श्रेणी अंतर्गत येणार्‍या उमेदवारांसाठी, नोंदणी शुल्क १,४०० रुपये असेल. जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरलेले उमेदवार भारतभरातील विविध आयआयटी आणि पदवीपूर्व इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास पात्र असतील. जेईई मेन २०२२ परीक्षेत २ लाख ५० हजारपेक्षा कमी रँक मिळविणारे उमेदवार जेईई अॅडव्हान्स २०२२ साठी बसू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/clat3sT

Post a Comment

Previous Post Next Post