Bank Of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदात विविध पदांवर भरती

https://ift.tt/M0BHY8F
BoB Recruitment 2022: सरकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने विविध विभआगांमध्ये एकूण १०५ पदांवर भरतीसाठी जाहिरात दिली आहे. या जाहिरातीनुसार, ४ मार्च २०२२ पासून फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट, एमएसएमई आणि कॉर्पोरेट क्रेडिट डिपार्टमेंटमध्ये मॅनेजर आणि ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार बँकेची वेबसाइट, bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची मुदत २४ मार्च २०२२ आहे. रिक्त पदांचा तपशील मॅनेजर (डिजिटल फ्रॉड) (फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट) – १५ पदे क्रेडिट ऑफिसर (एमएसएमई डिपार्टमेंट) – ४० पदे क्रेडिट एक्सपोर्ट/इंपोर्ट बिजनेस (एमएसएमई डिपार्टमेंट) – २० पदे फॉरेक्स अॅक्विझिशन अँड रिलेशनशिप मॅनेजर (कॉर्पोरेट क्रेडिट डिपार्टमेंट) – ३० पदे अर्ज कसा कराल? बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज करण्यासाठी वेबसाइट वर गेल्यानंतर करिअर सेक्शनमध्ये जा. तेथे संबंधित भरतीचीअधिसूचना डाउनलोड करण्याच्या लिंक सह ऑनलाइन अॅप्लिकेशन पेज वर जाण्यासाठी लिंक अॅक्टिव केली आहे. अर्जाच्या पेजवर उमेदवारांना आपले ई-मेल, मोबाईल क्रमांक आणि अन्य माहितीसह नोंदणी करायची आहे. नंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉग-इन करून उमेदवार आपला अर्ज सबमिट करू शकतील. उमेदवारांना ६०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल. एससी / एसटी / दिव्यांग / महिला उमेदवारांसाठी केवळ १०० रुपये शुल्क आहे. हेही वाचा:


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/hk2SN7X

Post a Comment

Previous Post Next Post