‘नवराष्ट्र’, ‘प्लॅनेट मराठी’ फिल्म ओटीटी अवॉर्ड लवकरच

https://ift.tt/bu6wQZY

पहिलावहिला सोहळा रंगणार ठाण्यात

navrashatra

मुंबई : प्रत्येकाने टाकलेले पहिले पाऊल, शाळेचा पहिला दिवस, पहिला मित्र-मैत्रीण, पहिला पाऊस आणि पहिले प्रेम जसे आयुष्यात महत्त्वाचे...अनन्यसाधारण.. अविस्मरणीय असते, तसाच भव्यदिव्य आणि अविस्मरणीय सोहळा रंगणार आहे ‘नवराष्ट्र, प्लॅनेट मराठी फिल्म ओटीटी अवॉर्ड २०२३.’

दै. ‘नवराष्ट्र’ व ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने झगमगत्या फिल्म आणि ओटीटीच्या दुनियेतील लखलखणाऱ्या सिताऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. ४ मे २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता हा सोहळा काशिनाथ घाणेकर सभागृह, ठाणे येथे होणार आहे.

 

मराठी फिल्म आणि ‘ओटीटी’ने सातासमुद्रापार आपला झेंडा रोवला आहे. या फिल्मी जगतातील नामांकित सिताऱ्यांचा ‘नवराष्ट्र’, ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने होणारा हा पहिलावहिला सन्मान सोहळा असेल. विशेष म्हणजे फिल्म व ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कलावंतांना गौरविणारे नवराष्ट्र आणि प्लॅनेट मराठी हे पहिले व्यासपीठ ठरले आहे. लवकरच या सोहळ्यासाठी व्होटिंग लाइन्स खुल्या होणार असून नामांकने जाहीर होतील. ‘नवराष्ट्र, प्लॅनेट मराठी फिल्म ओटीटी अवॉर्ड -२०२३’च्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या सोहळ्यात रसिकांना महाराष्ट्रातील अभिनेता, अभिनेत्री, लोकप्रिय फिल्म आणि बरेच काही निवडता येणार आहे.

 

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’ प्रथमच अशा प्रकारचा पुरस्कार सोहळा होत आहे. ज्यात चित्रपटांबरोबरच ओटीटीवरील कलाकृतींनाही  सन्मानित करण्यात येत आहे. यात चित्रपट, बेबसीरिज, कलावंत, तंत्रज्ञ अशा पडद्यावरील आणि पडद्यामागील सगळ्यांनाच गौरविण्यात येणार आहे. मला आनंद आहे की, नवराष्ट्रच्या साहाय्याने आम्ही हा सोहळा राबवत आहोत.’’

 

नवराष्ट्र, प्लॅनेट मराठीच्या या अवॉर्ड सोहळ्याची तयारी जसजशी पुढे जाईल, तसतशी सिनेरसिकांना माहिती दिली जाईल. रसिकांनो! व्हा तयार ‘नवराष्ट्र व प्लॅनेट मराठी फिल्म अवॉर्ड -२०२३’ या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी.



from मनोरंजन https://ift.tt/0WtdTv7

Post a Comment

Previous Post Next Post